“तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू”..मुख्यमंत्र्यांकडून कल्पिता पिंपळेंच्या प्रकृतीची विचारपूस

मुंबई नगरी टीम

ठाणे । ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज दिल्या.फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता त्यासध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे..ताई तुम्ही काळजी नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका फक्त लवकरात लवकर बरे व्हा, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांची विचारपूस केली.मुख्यमंत्री ठाकरे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून पिंपळे यांच्या प्रकृती बाबत माहिती घेत असतात. आज त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून पिंपळे यांच्याशी संवाद साधला.यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते.पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Previous articleएकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…!
Next articleअन्यथा गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार : अजित पवारांचा इशारा