एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…!

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस असून जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.दरम्यान या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते. वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेत, हातनूर धरणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून ओझरखेड धरणात पाठवले जाईल व या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जाणार आहे. आज ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर,रोहिणीताई खडसे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Previous articleएसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
Next article“तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू”..मुख्यमंत्र्यांकडून कल्पिता पिंपळेंच्या प्रकृतीची विचारपूस