पंकजाताई मुंडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट ;भेटीत काय चर्चा झाली ?

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.ही भेट नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असते असं ट्विट पंकजाताईंनी केले आहे.

पंकजाताई मुंडे दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. काल भाजपच्या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर त्यांचेशी चर्चा केली. या भेटीचे ट्विट त्यांनी केलं आहे. “आमचे नेते, देशाचे प्रभावी गृहमंत्री आणि सहकार क्षेत्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे अमितभाई शहा यांची भेट नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असते” असं त्यांनी म्हटले आहे.

Previous articleमनसे आणि भाजपची युती होणार की नाही ? देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
Next articleगुजरातचे कौतुक झाले,आता उत्तर प्रदेशचे कौतुक करतील…जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला