गुजरातचे कौतुक झाले,आता उत्तर प्रदेशचे कौतुक करतील…जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । एकदा गुजरातचे कौतुक करुन झाले आता उत्तर प्रदेशाचे कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचे कौतुक करायला दौरे करतील.जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही असे ठरवले असेल तर मग दुस-या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक केले होते.यावर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील खास आपल्या शैलीत उत्तरे दिली.एकदा गुजरातचे कौतुक करुन झाले आता उत्तर प्रदेशाचे कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचे कौतुक करायला दौरे करतील.दुसर-या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत असेही पाटील म्हणाले. मुंबईतील हिंदी भाषिक मनसेच्या मागच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपला माहिती आहे त्यामुळे भाजपकडून संघाने केले म्हणून आम्ही करत आहोत अशी गोष्ट तयार व्हायला लागलेली दिसते असेही पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपला सुनावले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीवर नुकतेच भाष्य केले होते.त्यावरही पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून.आमची कॉंग्रेसबरोबर आघाडी होती. आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती.त्यामुळे भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली असा उलट सवाल पाटील यांनी भाजपकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर देताना केला. आमच्याशी भाजपने चर्चा का केली.त्यातून शिवसेनेला बाजूला करा असे म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली हा प्रश्न माझ्यावतीने भाजपला विचारा असेही पाटील यांवेळी म्हणाले.

भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे महागाईचे मुळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला.केंद्रसरकार कुठल्याही राज्याला आऊट ऑफ वे जाऊन फारशी मदत करु शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात. असे एकाच राज्याला जास्त पैसे देणे या ज्या घोषणा मोदीसाहेब वेगवेगळ्या राज्यात जाऊन करतात मात्र तसं ते देऊ शकत नाहीत. पण काय करणार देशाचे पंतप्रधान बोलत असल्याने लोकं ऐकून घेतात असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Previous articleपंकजाताई मुंडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट ;भेटीत काय चर्चा झाली ?
Next articleजीव गेला तरी चालेल मात्र ओबीसींवरचा अन्याय सहन करणार नाही : छगन भुजबळ