ओ,भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्याचं चांगल काम करता,तेच करा.माझ्या नादी लागू नका !

मुंबई नगरी टीम

मुंबई । संजय राठोड प्रकरणावरुन शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एका भाषणात भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची नक्कल करीत लक्ष्य केले होते.जाधव यांच्या टीकेवर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करीत उत्तर दिले आहे.“ओ,भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका.जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता ? अशा शब्दात त्यांनी जाधव यांचा समाचार घेतला आहे.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना चित्रा वाघ यांची नक्कल करीत मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.संजय राठोड यांना लक्ष्य करताना जाधव यांनी चित्रा वाघ सध्या कुठे आहेत ? असा खोचक सवाल उपस्थित केला.त्या मुलीचा ज्या पद्धतीने छळ झाला,ज्या पद्धतीने तिने आत्महत्या केली,त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत असा आरोप केला.जाधव यांनी यापूर्वीही या प्रकरणावरून चित्रा वाघ यांचा उल्लेख करत नक्कल केली होती.भास्कर जाधव यांच्या टीकेला भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज व्हिडीओ शेअर करीत जाधवांचा चांगलाच समाचार घेतला. “ओ, भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता ? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना सुनावले आहे.

Previous articleप्रत्येक वेळी अजित पवारांचे नाव येते पण ७५ लोकांचे नाव येत नाही …अजित पवारांची नाराजी
Next articleधारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा ! दिल्लीत डेफिनेटिव्ह करारावर स्वाक्षरी