एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट; बँक खात्यात रक्कम जमा होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे,अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी,कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.

Previous articleविरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट..भेटी मागील नेमकं कारण काय ?
Next articleपरतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय