अरे थांब ना बाबा…..आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? अजितदादा भडकले

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निधी वाटपाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार हे खुलासा करीत असताना विरोधी बाकावरुन त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला असता,की जे बोलायचे ते उठून बोलायचे..थांब रे तुलाच लई कळतंय का,आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फटकारले.

आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निधी वाटपाबाबत खुलासा करीत होते.महाविकास आघाडीमध्ये आमदारांना ५ कोटीच्या निधीचे वाटप करण्यात आले होते,ते मी कबुल करतो असे यावेळी विरोधी पक्षनेते पवार म्हणाले.त्याच वेळी विरोधी पक्षातील आमदारांच्या याद्या घेऊन त्यांनाही २ कोटी रुपयांचा निधी दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली मात्र याच वेळी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.सभागृहात गोंधळ वाढत असतानाच अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का ? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? अशा शब्दात अजित पवार यांनी फटकारले.

Previous articleसत्तेत येण्यासाठी ते माशासारखे तडफडत होते; भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Next articleशेतक-याने अंगावर रॉकेल ओतून घेतले तर मंत्रालयात दोन तरूणांचा आत्महत्येचा प्रयत्न