सत्तेत येण्यासाठी ते माशासारखे तडफडत होते; भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचे विधेयक आज राज्य सरकारने सभागृहात आणले या विधेयकावर चर्चा करताना वार्ड रचनेवरून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या सह भाजपवर जोरदार हल्ला चढविला.

एकनाथराव शिंदे तुम्ही शिवसेनेचे नाव घेताय आणि सर्व निर्णय व कार्यक्रम भाजपचे राबवताय गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा,असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतलाय.तुम्हीच घेतलेले सर्व निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत.याचा अर्थ तुमच्याकडून सर्व निर्णय बदलून घेतले जात आहेत, सावध व्हा. कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा.गरज फक्त तुम्हाला नाही. त्यांनाही आहे असे सांगतानाच,सत्तेत त्यांनाही यायचे होते.ते कितीही नाही म्हणत असले सत्तेच्या बाहेर राहून ते अगदी माशासारखे तडफडत होते, असा हल्लाबोल जाधव यांनी केला.
नगरपालिकेच्या,महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत.आता प्रभाग रचना पुन्हा होणार आहे.झालेली प्रभाग रचना रद्द झालेली आहे, पण वॉर्ड रचना पडलेले आरक्षण पुन्हा बदलत आहेत. कोणा करता बदलत आहेत ? कोण आहे यांच्या पाठीमागे ? त्यावेळी नगरविकास मंत्री कोण होते ? आता नगरविकास मंत्री कोण आहे ? ज्यांनी स्वतःच्या खात्याच्या घेतलेला कारभार हा स्वतःच बदलायचा निर्णय घेतात यांचा अर्थ आता असलेले सरकार भाजपच्या हातातील बाहुली बनली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर हल्ला चाढविताना किमान स्वत:च्या मनाने विचार करा. प्रत्येक गोष्टीत तोंड घालून स्वत:चे हसे करून घेऊ नका. काव काव काय ? मला वाटलं आता पितृपक्ष येणार आहे. प्रॅक्टिस करतोय की काय गडी असे वाटलं. निर्लज्जपणाचा कळस आहे. , अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी
Next articleअरे थांब ना बाबा…..आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? अजितदादा भडकले