कंत्राटी वैद्यकीय सहायक,आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या वेळी कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्या वैद्यकीय सहायक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे गुणांकन करण्याची कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात वैद्यकीय सहायक,आशा सेविका, अंगणवाडी सेविका कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे.कोरोना काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Previous articleमुलाने विरोध केल्याने खासदार गजानन किर्तीकरांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला ?
Next articleनैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करून नागरी सुविधा देणार