परिस्थिती चिघळण्यास मुख्यमंत्री आणि मंत्री जबाबदार : शरद पवार
मुंबई : मराठा समाजाने आरक्षणसाठी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडल्या असून, कधीही कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहचू दिला नाही.या अस्वस्थेची दखल घेतली जात नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला परंतु मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पावले उचलण्याची गरज असतानाही विठ्ठल पूजेच्या निमित्ताने वारक-यांना त्रास होईल अशी साप सोडण्याची विधाने केली.त्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेजबाबदार विधानाची भर पडली त्यामुळेच बहुसंख्य घटकांचा संताप अनावर झाला.सर्व परिस्थिती चिघळण्यात ही मंडळी जबाबदार आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे.