मुख्यमंत्री बदलाल तर सरकारचा पाठिंबा काढू !

मुख्यमंत्री बदलाल तर सरकारचा पाठिंबा काढू !

अपक्ष आमदार रवी राणा यांचा इशारा

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री बदलाल तर सरकारचा पाठिंबा काढू असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

राज्यात सुरू असलेल्या मराठा मोर्चाच्या आदोलनाच्या पार्श्वभूभीवर राज्यात मुख्यमंत्री बदलाचे चर्चा असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे.काल रात्री महराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वर्षावर जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता आज अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे पाठीराखे अपक्ष आमदार रवी राणा यांनी तर मुख्यमंत्री बदलल्यास थेट सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला आहे.सात अपक्ष आमदारांपैकी अचलपूर अपक्ष आमदार बच्चू कडू वगळता इतर सहा आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत. यामध्ये रवी राणा यांच्यासह, गणपत गायकवाड, किशनराव जाधव पाटील शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.

Previous articleबंदच्या काळात मुख्यमंत्री कोठे होते हे महाराष्ट्राला कळायला हवे !
Next articleझेपत नसेल तर सरकारनं सरळ पायउतार व्हावं : राज ठाकरे