राष्ट्रवादी काॅग्रेसचे शिष्टमंडळ उद्या राज्य मागास आयोगाची भेट घेणार
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक उद्या होणार असून, राष्ट्रवादी काॅग्रेसचे शिष्टमंडळ राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष आणि राज्यनालांची भेट घेणार आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उद्या सोमवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचीही बैठक दुपारी १२ वाजता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी – ४ या शासकीय निवासस्थानी होणार असून, बैठकीनंतर पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपाल सी.विद्यासागररावआणि राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहे.