आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या
उद्धव ठाकरेंची मागणी
मुंबई : राज्य मागास आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.मराठा आरक्षणासंदर्भात आज शिवसेनेचे मंत्री, आमदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक मातोश्रीवर पार पडली. राज्य मागास आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या,अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडली. तसेच घटना दुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली.मराठा आरक्षणासंदर्भात आज शिवसेनेचे मंत्री, आमदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार आहेत.
काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी केली. मराठा बांधवांना नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे असेही त्यांनी सांगून मराठा समाजाने आक्रमकता सोडून कुठेही हिंसाचार करु नका असे आवाहनही त्यांनी केले.