काँग्रेसचे आमदार सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

काँग्रेसचे आमदार सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. मराठा समाज आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज विधानभवनात बैठक झाली.या बैठकीत आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला होता मात्र या मुद्यावर काँग्रेस पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले राजभवनावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काॅग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत अनेक आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला. तर याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यातील सध्याची परिस्थिती स्फोटक असून, यामध्ये आपण हस्तक्षेप करावा या शिष्टमंडळाने केली.शिवसेनेची अवस्था वरातीमागून घोडे अशी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना गंभीर असल्यास त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Previous articleठाणे पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर
Next articleकोकणातील  गणेशोत्सवासाठी  एसटीच्या २ हजार २२५ जादा बसेस