बीडच्या महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

बीडच्या महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : सावकारी जाचाला कंटाळून उस्मानाबाद जिल्हयातील एका महिलेने गेल्या आठवड्यात मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आज बीड येथिल राधाबाई साळुंखे या महिलेने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत  आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

बीडच्या राधाबाई साळुंखे या महिलेच्या जमिनीचा निकाल विरोधात लागला असल्याने महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. राधाबाई साळुंखे या बीडच्या रहिवासी आहेत. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Previous articleरामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार
Next articleमराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजप आमदारांची बैठक