पंकजा मुंडे यांनी प्रचार केलेल्या सर्वच्या सर्व १४ जागा भाजपने जिंकल्या

पंकजा मुंडे यांनी प्रचार केलेल्या सर्वच्या सर्व १४ जागा भाजपने जिंकल्या

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही दिसून आला. भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी घेतलेल्या चारही ठिकाणी सर्वच्या सर्व म्हणजे १४ पैकी १४ जागांवर भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

सांगली-मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणूकीत स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी व  प्रचंड आग्रहामुळे  पंकजा मुंडे यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ २७ जूलै रोजी सांगलीचा दौरा केला होता. सांगली येथील सांगलवाडी, विश्रामबाग आणि मिरज येथे शिवाजी चौक व जवाहर चौकात त्यांच्या जंगी सभा झाल्या होत्या. सभांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद व त्यांनी जनतेला केलेल्या विजयाच्या आवाहनामुळे सांगलवाडी येथे व जवाहर चौक प्रभागात प्रत्येकी ३ व विश्रामबाग व शिवाजी चौक प्रभागात प्रत्येकी ४ म्हणजे सर्वच्या सर्व १४ जागांवर भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. कॅाग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका देत भाजपने या निवडणूकीत बहुमत मिळविले  आहे. या निकालानंतर  पंकजा मुंडे यांनी दूरध्वनीवरून  भाजपचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

 

Previous articleराज्यातील आणखी ५४ ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत
Next articleमुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करा