मराठा आरक्षणापर्यंत मेगा भरतीला स्थगिती : मुख्यमंत्री

मराठा आरक्षणापर्यंत मेगा भरतीला स्थगिती : मुख्यमंत्री

तरुणांनो आत्महत्या करु नका

मुंबई : मराठा आरक्षणावर कोणत्याही परिस्थितीत येत्या नोव्हेंबर पर्यंत कार्यवाही पूर्ण करू असे आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मराठा समाजाच्या राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल.परंतु तरुणांनी आत्महत्या करु नये असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात केले.

राज्यात होणारी मेगा भरती थांबवत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत ही मेगा भरती थांबवली जाईल. मेगा भरती संदर्भात अनेक मराठा तरुणांमध्ये गैरसमज आहेत त्यामुळे या भरतीला स्थगिती दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.मराठा आरक्षणाबाबत जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि सत्य माहिती देण्यासाठी हा संवाद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट करीत  इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. पण तरुणांनी आत्महत्या करु नये असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनातील तरुणांना आपल्या संवादातून केले आहे.

अध्यादेश काढण्याची मागणी केली जात आहे. असा अध्यादेश आत्ताही काढला जाऊ शकतो.मात्र तो तात्पुरता ठरेल आणि न्यायालयात टिकू शकणार नाही. अशा प्रकारच्या अध्यादेशातून जनतेची फसवणूक होईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मागासवर्ग आयोग येत्या ७ ऑगस्टला हा अहवाल केव्हा देणार आहे हे स्पष्ट करणार आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात मागासवर्ग आयोगाला निर्देश दिले आहेत.असे सांगतानाच संघर्ष पुरे झाले. आता संवादातून मार्ग काढूया. ही वेळ राजकीय कुरघोडी करण्याची नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

Previous articleसगळ्या धर्मांना समान न्याय हवा : राज ठाकरे
Next articleमुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन मागे !