एकनाथ शिंदेंकडे चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

एकनाथ शिंदेंकडे चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

मुंबई: शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील महत्व वाढले आहे.कोकणातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता प्रत्यक्ष तयारीला सुरुवात केली. ठाणे जिल्हयात शिवसेना बळ देणारे शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यापूर्वी कोकणतल्या या चारही मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. देसाईंकडे आता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी असेल.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन मागे !
Next articleछगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड ;जसलोक रुग्णालयात दाखल