छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड ;जसलोक रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड ;जसलोक रुग्णालयात दाखल

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना आज जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना छगन भुजबळ यांना श्वसनाचाही त्रास आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.आवश्यक भासल्यास पुढील उपचारांसाठी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येण्याची शक्यता आहे.ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार ६ सप्टेंबरपर्यंत भुजबळ यांच्यासह ३५ आरोपींना वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Previous articleएकनाथ शिंदेंकडे चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी
Next articleवारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? : चव्हाण