घोषणा करणे आणि घोषणांना स्थगिती देणे हेच मुख्यमंत्र्यांचे काम

घोषणा करणे आणि घोषणांना स्थगिती देणे हेच मुख्यमंत्र्यांचे काम

नवाब मलिक

मुंबई : घोषणा करणे आणि त्या घोषणांना स्थगिती देणे हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने राहिली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मराठा आरक्षण नोव्हेंबरमध्ये लागू करण्याचे संकेत देतानाच ७२ हजार नोकरभरतीला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्या या घोषणेचा समाचार घेताना मलिक यांनी घेतला.सरकारने भरतीवर बंदी आणली होती. तो निर्णय कुठे चुकीचा होता हे आता निश्चित होत आहे. सर्वच खात्यामध्ये सातत्याने कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सातत्याने भरती प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. मात्र मोठा आकडा निर्माण करुन नंतर मेगा भरती करु ही सरकारची भूमिका चुकीची आहे असेही मलिक म्हणाले.

शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्याचा परिणाम कामावर दिसत आहेत. कर्मचाऱ्यांची भूमिका आहे की, तुम्ही नोकर भरती केली पाहिजे. सातवा वेतन आयोग असेल किंवा कामाचा ताण असेल त्यामुळे निश्चित रुपाने कर्मचारी,अधिकाऱ्यांवर त्याचा परिणाम होत असतो. तो ताण कमी करण्याची जबाबदारी सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची असते. त्यामुळे कर्मचारी,अधिकारी यांचे समाधान होईल अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि नोकर भरतीबाबत जर अधिसूचना निघाली नाही तर स्थगिती कशी दिली असा सवाल करीत लोकांची दिशाभूल करत त्याला स्थगिती दिली आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हा नवा प्रश्न मुख्यमंत्र्यांनीच आता निर्माण केला आहे असेही मलिक म्हणाले.

Previous articleवारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? : चव्हाण
Next articleआण्णासाहेब पाटील महामंडळ यापुढे केवळ मराठा समाजासाठीच असणार