१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर 

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर 

मुंबई : सातव्या  वेतन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.या संपात सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याने कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. उद्यापासून सुरू होणा-या या संपात मंत्रालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभागी होणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारने आमची फसवणूक केली असल्याने आम्हाला संपाचे हत्यार उपसावे लागले असल्याची प्रतिक्रिया समन्वय कृती समितीचे अध्यक्ष विश्वास काटकर आणि निमंत्रक गजानन शेटे यांनी दिली.७२ हजार पदांची मेगा भरती रद्द करण्यात आल्याची घोषणा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पदे रिकामी असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याने या जागा तात्काळ भरल्या जाव्यात अशी मागणी ही त्यांनी केली.

Previous articleआण्णासाहेब पाटील महामंडळ यापुढे केवळ मराठा समाजासाठीच असणार
Next articleनितीन गडकरी यांच्या कबुलीमुळे बेरोजगारीवर शिक्कामोर्तब