मराठा आणि बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव : शरद पवार

मराठा आणि बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव : शरद पवार

मुंबई : राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून, मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डावही खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. घटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे अशांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाचा, राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असून, मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत असा आरोप पवार यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मराठा समाजाला अन्य समाजापासून वेगळे पाडण्याचा हा डाव यशस्वी होऊ न देण्याची खूणगाठ मनाशी बांधा, आणि हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेला प्राधान्य द्यावे’, असे आवाहन शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक

Previous articleराज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या योजनांवरील खर्चात तिप्पट वाढ
Next articleपानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरेंची राजकीय फटकेबाजी!