पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरेंची राजकीय फटकेबाजी!

पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरेंची राजकीय फटकेबाजी!

पुणे : १९६० पासून आतापर्यंत पाटबंधारे खात्याचा पैसा कुठे गेला असा सवाल करीत, पाटबंधारे खात्यात जे पाणी मुरलं ते अडवले असते. तर राज्यातील पाण्याची पातळी वाढली असती.असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते.

येथे आज पानी फाऊंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते.या कार्यक्रमातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हा टोला लगावला.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी अभिनेता अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुकही केले.  अमीर खानच्या पानी फाऊंडेशन सोबत सरकारी अधिकारी काम करत असताना हे अधिकारी सरकारसोबत काम का करीत नाही.असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Previous articleमराठा आणि बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव : शरद पवार
Next articleमी मुख्यमंत्री बोलतोय’ नव्हे तर ‘मी घोटाळेबाज बोलतोय’!