राजेश नार्वेकर ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी
मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव राजेश नार्वेकर यांची ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, महेंद्र कल्याणकर यांची मंत्रालयात उद्योग, उर्जा, कामगार विभागाचे सह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज ९ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची मंत्रालयात उद्योग, उर्जा, कामगार विभागाचे सह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी राजेश नार्वेकर यांची ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सुनिल चव्हाण यांची रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांची बदली माहिती तंत्रज्ञान मुंबई येथे करण्यात आली आहे.अमन मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.अनुपकुमार यांची पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्स्योद्योग विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.आभा शुक्ला यांची सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागात प्रधान सचिव ,डाॅ.संजीवकुमार यांची नागपूर येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून तर आर.एच.ठाकरे यांची नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.