नीरव मोदीसह बड्या उद्योगपतींचे अलिबाग मधिल बंगले जमीनदोस्त करणार

नीरव मोदीसह बड्या उद्योगपतींचे अलिबाग मधिल बंगले जमीनदोस्त करणार

मुंबई : हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रूपयांचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीसह, मेहुल चोक्शी,महेंद्र खटाव आदी बड्या उद्योगपतींचे अलिबाग परिसरात असलेले अनधिकृत बंगले जमीन दोस्त करण्यात येणार आहे.अलिबाग आणि मुरुड परिसरातील समुद्रकिनारी असलेल्या अनाधिकृत बंगले, फार्महाऊसवर महिनाभरात कारवाई केली जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या अनधिकृत बंगल्याबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी कदम बोलत होते.

अलिबाग मध्ये १४५ तर मुरुडमध्ये १६७ बंगले अनधिकृत आहेत. त्यात अलिबाग मधील ६० तर मुरूडमधिल ५० बंगले हे स्थानिक रहिवाशांचे आहेत. एकूण अनधिकृत बंगल्या पैकी अलिबाग मधील ६१ आणि मुरुड मधील १०१ बंगल्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे अनधिकृत बंगले, फार्महाऊस उद्योगपती, सिनेमा सृष्टीतील कलावंतांचे आहेत. दोषी बंगला धारकांना १ लाख रुपये दंड आणि ५ वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते. महिनाभरात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असेही कदम यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आढावा बैठक पार पडली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात फरार झालेला नीरव मोदीचा अलिबागमधील किहीम या गावात बंगला आहे. तर मेहुल चोक्सीचा बंगला आवास या गावात आहे.महेंद्र खटाव,अनिल खटाव, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आदी बड्या व्यक्तींचे अनधिकृत बंगले अलिबाग परिसरामध्ये आहेत. नीरव मोदीसह बड्या उद्योगपतीच्या अनाधिकृत बंगले, फार्महाऊसवर महिनाभरात कारवाई केली जाणार आहे.

Previous articleमंत्री गिरीष महाजनांसह १०० जणांचे वैद्यकीय पथक केरळ मध्ये
Next articleदाभोळकर,पानसरे हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घ्या