मुरली मनोहर जोशींनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी भेट घेतली. सुमारे तासभर या दोन नेत्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.
शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जावून भेट घेतली होती.त्यानंतर आज भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने मित्रपक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून मुरली मनोहर जोशी यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.