केरळ पूरग्रस्तांसाठी रामदास आठवलेंची २५ लाखाची मदत

केरळ पूरग्रस्तांसाठी रामदास आठवलेंची २५ लाखाची मदत

मुंबई : केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी केरळच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचे जाहीर केले आहे. महापूरामुळे केरळ राज्याचे २० हजार करोडचे नुकसान झाले असल्याचे सांगत देशभरातील उद्योगपतींनी केरळ आर्थिक मदत केली पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. आठवलेंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या दोन महिन्यांच्या वेतनाचा धनादेश केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मल्लपुरम जिल्हा अधिकाऱ्यांकडे नुकताच सोपविला आहे.

केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले असून त्यांनी मल्लपुरम जिल्ह्याचा दौरा केला तर आज एर्नाकुलम येथील आलनगाड जवळील कलमाचेरी तालुक्यातील अलुवा गावात पुरग्रस्तांच्या मदतकार्याची पाहणी केली. पूरग्रस्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत चौकशी केली. पूरग्रस्तांच्या शिबिराला भेट दिली.कलमाचेरी येथे जिल्हा प्रशासनासोबत आठवले यांनी बैठक घेऊन मदत कार्याची माहिती घेतली. कलमाचेरी येथील मल्लपेरिया नदीला आलेल्या महापुरात अलुवा गाव आणि परिसर उध्वस्त झाला होता.त्याभागाची ना रामदास आठवले यांनी आज पाहणी केली. येथील पूरग्रस्तांना ओणम सणाच्या पर्श्वभूमीवर आठवलेंच्या हस्ते ओणमचे किट आणि जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

केरळच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वोतोपरी मदत केली पाहिजे असे सांगत उद्योगपतींनीही केरळ ला मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे.

Previous articleमाळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर देखील पोहचावे
Next articleग्रामरचनेसाठी ज्ञानप्रधान युगाचा सेतू रचण्याची गरज : डाॅ. अनिल काकोडकर