शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या सोमवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.
उद्या सोमवारी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणा-या या बैठकीला प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. नालासोपाऱ्यातून नुकतीच स्फोटके हस्तगत करण्यात आली.त्यानंतर घडलेल्या घडामोडी आणि त्याच्या समर्थनार्थ निघणारे मोर्चे यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार केली जाण्याची शक्यता आहे.