या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय..!

या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय..!

मुंबई राष्ट्रवादीचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रोश आंदोलन

मुंबई : गगनाला भिडलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काॅग्रेस आक्रमक झाली आहे. गरीबांची चेष्टा बंद करा..पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा…या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय…मोदी सरकार हाय-हाय… मोदी सरकार हाय-हाय…पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणांनी राष्ट्रवादी काॅग्रेसने आज मुंबई दणाणून सोडली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईमध्ये सरकारच्याविरोधात मुंबई मधील पेट्रोल पंपामध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले.यावेळी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना काळे कमळ देवून सरकारचा निषेध करण्यात आला आणि हे कमळ देवून दरवाढ करणाऱ्या अशा सरकारला निवडून दिल्याची आठवण करुन देण्यात आली. हे कमळचं काळं फूल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली.

Previous articleमागासवर्गीयांवर अन्याय करणारे समांतर आरक्षणाचे परिपत्रक तातडीने रद्द करा
Next articleशिवसेना लोकसभेच्या सर्व जागा लढविणार