नोटाबंदीचा निर्णय म्हणजे “विळा मोडून खिळा केला”
धनंजय मुंडेंची खरमरीत टीका
मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या तब्बल ९९.३० टक्के नोटा पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचे निष्पन्न झाल्याने फसलेल्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.तर मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे “विळा मोडून खिळा केला” असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे आकडेवारीवरून आज सिध्द झाले आहे. रिझर्व्ह बँकेचा या वर्षीचा वार्षिक अहवाल आज सादर झाला. त्या मधिल आकडेवारीवरुन नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
आजच्या या अहवालानंतर धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील रोजगार, उद्योगधंदे, लघुउद्योग बुडाले आहे.शेतकरी , शेतमजूर,देशोधडीला लागला.एका फटक्यात घेतलेल्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था उध्दवस्त झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा विक्षिप्त निर्णय घेवून “विळा मोडून खिळा केला” अशी खरमरीत टीका मुंडे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.










