औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे मनसेत

औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे मनसेत 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी महापौर आणि  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी असलेले सुदाम सोनवणे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद दौ-यावर असून,औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी महापौर  सुदाम सोनवणे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश.  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडताच सोनवणे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काॅग्रेसमध्ये प्रवेश केला होता.सध्या ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी होते.

Previous articleनंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next articleमिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना वाचवण्यासाठीच अटक सत्र !