कुलस्वामी क्रेडिट सोसायटीच्या प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
संस्थेच्या १००० कोटी व्यवसायाचा उद्दिष्टपूर्ती सोहळाही साजरा होणार
मुंबई : श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन आणि संस्थेच्या १००० कोटी व्यवसायाचा उद्दिष्टपूर्ती सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दि. २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता होत आहे. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार उपस्थित असतील. शरददादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
कुलस्वामी क्रेडिट सोसायटीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशीतील एफ ३/१, सेंट्रल फॅसिलिटी, ए.पी.एम.सी., फुल मार्केट, सेक्टर १९ येथे होणार आहे. त्यानंतर तर रु. १००० कोटी व्यवसायाचा उद्दिष्टपूर्ती सोहळा सिडको एक्झिबिशन सेंटर, एक्झिबिशन हॉल नं. १, सेक्टर ३०, वाशी रेल्वे स्टेशनजवळ, वाशी, नवी मुंबई येथे होईल.
या कार्यक्रमाला आमदार मंदाताई म्हात्रे, शशिकांत शिंदे, संदीप नाईक, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या उप महापौर मंदाकिनीताई म्हात्रे विशेष अतिथी असतील. तर मराठी बाणाचे अशोक हांडे, नवी मुंबई पालिकेचे सभागृहनेता रवींद्र इथापे, मुंबई बँकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, नितीन बँकर, घाऊक भाजीपाला व्यापारी संघाचे अध्यक्ष कैलास ताजने, राजेंद्र शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक सोसायटीचे अध्यक्ष शंकर पिंगळे, उपाध्यक्ष संतुष्ट चव्हाण यांनी केले आहे.










