गुरुदास कामत यांच्या स्मरणार्थ विलेपार्ले येथे शनिवारी प्रार्थना सभा
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माजी सरचिटणीस आणि काँग्रेस कार्यकारी समिती सदस्य गुरुदास कामत यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक १ सप्टेंबर २०१८ राजी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुकेश आर. पटेल सभागृह, एनएमआयएमएस न्यू बिल्डिंग, मिठीबाई कॉलेजसमोर, एन. एस. रोड नंबर १, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई, येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत ही प्रार्थना सभा होईल. कामत यांच्या काँग्रेसमधील परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थनासभेस कामत यांच्या पत्नी माहरुख, आणि पुत्र डॉ.सुनील कामत उपस्थित राहणार आहेत.










