महेश मांजरेकरांच्या काँग्रेस प्रवेशाने आनंदच होईल
कोल्हापूर : प्रसिध्द अभिनेते आणि मनसेकडून लोकसभा निवडणूक लढविलेले महेश मांजरेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देवून काँग्रेस महेश मांजरेकर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
काॅग्रेसने सरकारच्या विरोधात कोल्हापूरातुन जनसंघर्ष यात्रेला सुरूवात केली आहे. तर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हेही कोल्हापुरमध्येच आहेत.त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर हे कॉलेज मित्र आहेत. मांजरेकर यांनी नुकताच काही मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मांजरेकरांनी चव्हाणांसोबत नाश्ता करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.मांजरेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.