मागाठाण्यात साजरा होणार व्यसनमुक्ती आणि प्लास्टिक थर्मोकोल मुक्तीचा दहीकाला महोत्सव
मुंबई : उपनगरातील मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हे दरवर्षी भव्य दहिकाला महोत्सवाचे आयोजन करतात यंदा दहिहंडी साजरी करतानाच व्यसनमुक्ती आणि प्लास्टिक थर्मोकोल मुक्तीचा दहीकाला महोत्सव साजरा केला जाणार आहे.या महोत्सवाला शिवसेना नेते विविध मंत्री आणि सिने अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. प्रकाश सुर्वे यांनी दिली.
सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयामुळे अनिश्चियाच्या गिरक्यातून बाहेर येत भारतीय संस्कृतीचा वसा पुढे नेण्यासाठी, तसेच गोविंदा पथकांना दिलासा देण्यासाठी नायालयाच्या निर्णयाधीन राहून शिवसेना मागाठाणे विधानसभा क्षेत्र व तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन, प्रेरणाशोत्तर यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई उपनगरात, देवीपाडा मैदान, एक्सप्रेस हायवेच्या बाजूला, बोरिवली (पूर्व) येथे भव्य मागाठाणे दहीकाला महोत्सवाचे आयोजन मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रेरणेने करण्यात आले आहे. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भव्य मागाठाणे दहीकाला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मागाठाणे दहीकाला महोत्सवाद्वारे तंबाखु, गुटखा, व्यसन तसेच प्लास्टिक व थर्माकोल मुक्तीचा संदेश देण्यात येत आहे.
प्लास्टिक व थर्माकोल मुक्त पर्यावरण पूरक संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न या मागाठाणे दहीकाला महोसवाद्वारे करण्यात आले आहे असे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. फक्त मनोरंजन नसून, मनोरंजन व प्रबोधन याची सांगड घालण्याचा प्रयंत्न आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला असून, त्यासाठी खेळ साहसी, मराठी मातीचा, आपल्या संस्कृतीचा, प्रबोधनाचा हे मागाठाणे दहीकाला महोत्सवाचे ब्रीद वाक्य आहे असे मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. सलामी देणाऱ्या पथकांमध्ये महिला गोविंदा पथकांना प्राधान्य देण्यात येणार असून थराच्या रक्कमे व्यतिरिक्त महिला पथकांना ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. मागाठाणे दहीकाला महोत्सवात मुंबई, ठाणे येथील अंदाजे १ हजार दहीकाला पथक सलामी देण्यासाठी उपस्थित राहतील, दहीकाला पथकांना बक्षीस स्वरूपात प्रोत्साहनपर आथिक मदत करण्यात येईल. अशी माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली. सदर दहीकाला महोत्सवात विविध संगीत, नुर्त्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी, हिंदी सिनेसुष्टीतील अनेक सेलिब्रेटीस आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
सिने तारका रविना टडंन, रश्मी देसाई. राधिका आपटे, मुग्धा गोडसे, श्रुती मराठे, तेजा देवकर, स्मिता गोंदकर, तसेच ढोलकीच्या तालावर फेम नृत्यांगना नृत्याची दिलखेच अदा पेश करतील. तसेच सिने अभिनेता अनिकेत विश्वासराव या दहीकाल्यात उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम , उद्योगमंत्री सुभाष देसाई , परिवहनमंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री दीपक सावंत, मिलिंद नार्वेकर, आमदार विलास पोतनीस, विनोद घोसाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. सदर दहीकाला महोस्तवाचे थेट प्रेक्षपण इंडिया टीव्ही, आज तक, झी २४ तास, आय.बी.एन. लोकमत, साम मराठी, मी मराठी, स्कोड – १८, सुदर्शन न्युज, रेडिओ एफ.एम., फिवर १०४ या वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, तसेच या दहीकाला महोत्सवास २५ ते ३० हजार प्रेषक उपस्थित राहतील, असे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले.