आगामी निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार

आगामी निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार

कराड : राज्यात ‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असतानाच दुसरीकडे काॅग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत आज कराडमध्ये काँग्रेसने मोदी आणि फडणवीस सरकारच्या पापाची प्रतिकात्मक हंडी फोडून अनोख्या पध्दतीने दहीहंडीचा उत्सव साजरा केला.

जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात कऱ्हाड मध्ये मोदी आणि फसवणीस सरकारच्या पापाची हंडी फोडून काँग्रेसने केली.२०१९ च्या निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार अशी घोषणा काँग्रेसने केली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते.या यात्रेदरम्यान काँग्रेसने मोदी आणि फडणवीस सरकारच्या बांधलेल्या पापाची प्रतिकात्मक हंडी खा.चव्हाण यांनी फोडली.

Previous articleनाकर्त्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी नविन प्रश्न निर्माण केले: खा. अशोक चव्हाण
Next article…तर राजकारण सोडेन : एकनाथ खडसेंचा इशारा