नरेंद्र पाटलांनी दिला राष्ट्रवादीचा राजीनामा
मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविला आहे. नरेंद्र पाटलांची नुकतीच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपलेले आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज आपल्या सदस्यपदाचा राजीनामा आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पाठवला आहे.दोनच दिवसापूर्वी जाहीर झालेल्या महामंडळांच्या नियुक्तीत नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजपच्या कोट्यातून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये असताना आपण दिलेले सहकार्य आणि पाठबळाबद्दल मी आभारी आहे. असे शरद पवार यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.










