ऑफर आल्यास भाजपत जाणार : नरेंद्र पाटील
मुंबई : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असून,ऑफर आल्यास भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली.
राषट्रवादी काॅग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली. महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली असल्याने महामंडळाचे कामकाज करताना अडचण भासू नये म्हणून आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले.यापुढे महामंडळाच्या कामकाजात लक्ष केंद्रित करून मराठा समाजातील तरूणांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपने आपली आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदी नेमणूक केली असली तरी तुर्तास कोणत्याही निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत दुरध्वनीवरून माहिती दिली असून,भविष्यात भाजपने ऑफर दिल्यास भाजपत जावू असे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.