आमदार राम कदमांसह मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : मुंडे

आमदार राम कदमांसह मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : मुंडे

मुंबई : घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या वेळी महिलांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून, आ. राम कदम यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला वर्गाची माफी मागावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

काल घाटकोपर येथे आयोजित केलेल्या दहिहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आ. कदम आणि भाजपवर चौफेर टीका होत असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आ. कदम यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.आ कदम यांनी महिलांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून, महिला भगिनींचा अवमान करणारे आहे. त्यांनीच नाही तर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous articleऑफर आल्यास भाजपत जाणार : नरेंद्र पाटील
Next articleआ. राम कदमांच्या अडचणीत वाढ !