आ. राम कदमांच्या अडचणीत वाढ !
मुंबई: घाटकोपर येथिल दहिहंडी कार्यक्रमात वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून, आ. कदम यांच्या वक्तव्यामुळे भाजपवर टीका होत असल्याने भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने आ. राम कदम यांच्या विधानाची सीडी मागवली आहे.
वादग्रस्त विधान करून नंतर माफी मागणारे आ. राम कदम यांच्या वक्तव्यामुळे आ. कदम यांच्यासह भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे.त्यांच्या या विधानाची प्रदेश भाजपने गंभीर दखल घेत आ. राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची सीडी मागवली आहे. त्यामुळे आता आ. कदम यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.आ. कदम यांच्या विधानाविरोधात विविध पक्ष आणि संघटना आ. राम कदम यांच्या घापकोपरच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणार आहेत.