“राम नव्हे रावण” मनसेची पोस्टरबाजी
मुंबई : भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहिहंडी कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वक्तव्याविरोधात पोस्टरद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
नकार असला तरीही मुलगी पळवून आणण्यात तुमची मदत करतो’, असे वक्तव्य भाजपचे आ. राम कदम यांनी केल्यानंतर यांच्यावर सर्व स्तरातून सडकून टीका होताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात घाटकोपर, भिवंडी येथे
मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात येवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या पोस्टरमध्ये ”राम नव्हे रावण”,असा आ. कदम यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेकडून आ. कदम यांच्या विरोधात लावण्यात आलेले पोस्टर्स पोलिसांनी हटवले आहेत.