प्रवक्तेपदावरून आ. राम कदमांची हकालपट्टी ?
मुंबई : बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता असून, कोणत्याही वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होवू नये अशा तोंडी सूचना त्यांना पक्षाकडून देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
घाटकोपरच्या दहिहंडी कार्यक्रमात केलेले वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार राम कदम यांना भोवण्याची शक्यता असून, त्यांचे पक्ष प्रवक्तेपद धोक्यात आले आहे. आमदार कदम यांच्या विधानानंतर याचे पडसाद राज्यभर उमटल्याने भाजपाची कोंडी झाली आहे.यावर मलमपट्टी म्हणून आ. कदम यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात येवू शकते. प्रवक्ते म्हणून कोणत्याही वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होवू नका अशा तोंडी सूचना पक्षाच्यावतीने त्यांना देण्यात आल्याने त्याच्या प्रवक्तेपदावर गदा येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.