राम कदमांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस !
माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखाचे बक्षीस दिले जाईल असे वादग्रस्त वक्तव्य माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केले आहे.
घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे सध्या राज्यभरात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच बुलडाण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. आमदार राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याच्या या वक्तव्याची चित्रफित सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.