यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : चंद्रकांतदादा

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : चंद्रकांतदादा

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा किंवा पदवीधर मतदारसंघ अशी कोणतीही निवडणूक यापुढे लढवणार नाही, अशी घोषणा आज राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून राजकीय वर्तुळाला धक्का दिला आहे.

कोल्हापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. गणेशोत्सवात स्पिकरची भिंत लावण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत मतभेद निर्माण झाल्याने अचानक कलाटणी देत महसूलमंत्री पाटील यांनी राजकीय वर्तुळाला धक्का देणारे विधान केले. आगामी विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातील भाजपाचे उमेदवार म्हणून महसूलमंत्री पाटील यांचे नाव घेतले जात असताना महसूलमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आमदार  क्षीरसागर यांनी खुशाल निवडणूक लढवावी, यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही,अशी घोषणा दादांनी केली.

Previous articleराम कदमांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस !
Next articleचौफेर टीका होताच आ. राम कदमांनी “ते” ट्विट केले डिलीट !