चौफेर टीका होताच आ. राम कदमांनी “ते” ट्विट केले डिलीट !

चौफेर टीका होताच आ. राम कदमांनी “ते” ट्विट केले डिलीट !

मुंबई : भाजपाचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आज त्यांनी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबत श्रध्दांजली अर्पण करणारे ट्विट करत अजून नाराजी ओढवून घेतली आहे.त्यांच्या या प्रतापामुळे समाज माध्यमांवर हल्लाबोल होताच त्यांनी ते ट्विट डिलीट केले.

मुली पळवण्याच्या विधानावरुन राजयभर आ. कदम यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत.त्यात भर म्हणून त्यांनी अमेरीकेत उपचार घेत असलेली  अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्विट करत श्रद्धांजली वाहिली.आपली चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्विट लगेच डिलीट केले मात्र त्यांच्या या प्रतापामुळे त्यांच्यावर समाज माध्यमातून चौफेर टीकेची झोड उठली होती.

हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोऴ्यांचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड. यांचे अमेरिकेत निधन झाले आहे”, अशा आशयाचे ट्विट आ. राम कदम यांनी केले होते.”गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रे यांच्याबाबतची अफवा पसरली होती. त्यांच्या स्वास्थ्यासाठी व  प्रकृतीत  लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो”, असे ट्विट करत आ.राम कदम यांनी नव्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत असून,त्या आपल्या आजाराबाबतची प्रत्येक माहिती समाज माध्यमावरून चाहत्यांना देत आहेत.

Previous articleयापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : चंद्रकांतदादा
Next articleआ.राम कदमांच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल