आ.राम कदमांच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आ.राम कदमांच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बार्शी : मुली पळवण्याचे विधान करून महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर आता बार्शी पोलीस ठाण्यात प्रक्षोभक विधान करुन शांतता भंग केल्याप्रकरणी आ.कदम यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी पोलीस ठाण्यात भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात मंदाकिनी पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. महिलांचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक विधान करुन भाजपाचे आमदार राम कदम यांनी शांतता धोक्यात येईल, असे कृत्य केल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.भादंवि ५०४ कलमांअंतर्गत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर यापूर्वीच घाटकोपर पोलिसांनीही आ. कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleचौफेर टीका होताच आ. राम कदमांनी “ते” ट्विट केले डिलीट !
Next articleमुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का?