मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का?
अजित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल
पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज भाजपाचे आमदार राम कदमांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे.मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का? अशा शब्दात त्यांना फटकारले आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. एक आमदार महिलांबाबत असे वक्तव्य करतो.पण त्यांच्या पक्षाचे प्रमुखह काही बोलू शकत नाहीत हे आणखी घातक आहे असे सांगत, या विधानावर माफी मागणे तर लांबच, पण खेद काय व्यक्त करतात, दिलगिरी काय व्यक्त करतात,सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि हा निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू ,तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आली याला अशा खरपूस शब्दात अजित पवार यांनी राम कदमांचा समाचार घेतला.