समाज माध्यमातल्या युद्धासाठी आठवलेंचे “सायबर पँथर्स’ सज्ज

समाज माध्यमातल्या युद्धासाठी आठवलेंचे “सायबर पँथर्स’ सज्ज

मुंबई : रिपाई (आठवले गट) विरोधकांना समाज माध्यमावरच्या युद्धात जशास तसे उत्तर देण्यासाठी रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे सायबर पँथर्स सज्ज झाले आहेत. सोमवार १० सप्टेंबर रोजी या सायबर पँथर्सची राज्यस्तरीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

समाज माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार तळागाळात पोहचविण्यासाठी, पक्षविरोधी खोट्या बातम्यांमागील तथ्य तळागाळात पोचविण्यासाठी रामदास आठवलेंनी आयटी सेल सुरू केला आहे. ज्या प्रमाणे काँग्रेसच्या आयटी सेल मध्ये काम करणाऱ्यांना “राजीव के सिपाही” म्हणतात, भाजपच्या आयटी सेल मधील कार्यकर्त्यांना “सायबर योद्धा”, म्हणतात त्याच धर्तीवर रामदास आठवले एक पँथर असल्यामुळे, या आयटी सेल मधील प्रत्येक व्यक्ती हा “सायबर पँथर” म्हणून काम करेल असं सांगण्यात येत आहे. आतिश कांबळे या आयटी सेलचे प्रमुख आहेत.ते आयटी प्रोफेशनल असून, त्यांना आयटी क्षेत्राचा १८ वर्षाचा अनुभव आहे. सध्या ते आयटी सेलच्या उभारणीत प्रमुख सायबर पँथर म्हणून भूमिका निभावत आहेत.

दहा सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता या आयटी सेलची राजस्तरीय कॉन्फरन्स हॉटेल द हिल ग्रीन, कैलास कॉम्प्लेक्स, विक्रोळी (पश्चिम ) या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, स्वतःरामदास आठवले या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क,अतिष कांबळे,८२९१२६५६५५, ८१६९३९७५९१

Previous articleमुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का?
Next articleराम कदमांचे नाव घेताच मुख्यमंत्र्यांनी जोडले हात !