कोकणात विध्वसंक प्रकल्प आणण्याचे सरकारचे प्रयत्न : राज ठाकरे

कोकणात विध्वसंक प्रकल्प आणण्याचे सरकारचे प्रयत्न : राज ठाकरे

मुंबई : विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना केली.

कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे भाषण सुरू होण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतियांचे प्रयत्न सुरू आहेत. पण तुम्ही तुमच्या जमिनी त्यांना देऊ नका, सावधान राहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. यांनी म्हटले. गणेशोत्सवासाठी जपून जा आणि जपून परत मुंबईला या, मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मिश्किल सल्ला दिला. कोकणातील भूमी ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.असे सांगतानाच कोकणाकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले असल्याची टीका त्यांनी केली.कोकण भारतरत्नांची भूमी असून, एकट्या दापोलीतून ४ भारतरत्न देशाला दिल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Previous articleभाजपचा विकासच २०१९ मध्ये जनतेला बोलेल – पंकजा मुंडे
Next articleराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय चिटणीसपदी आमदार हेमंत टकले