बंद शांततेत पाळल्याने गृहराज्यमंत्र्यांने मानले विरोधकांचे आभार
मुंबई: पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज पुकारलेला बंद शांततेत पाळल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री ( ग्रामिण ) दिपक केसरकर यांनी विरोधकांचे आभार मानले आहे.
काँग्रेससह २१ पक्षांनी पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज पुकारलेला बंद काही तुरळक घटना वगळता शांततेत पार पडला.या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून,या बंद दरम्यान कुठेही जबरदस्ती करण्यात आली नाही. यापूर्वी झालेल्या बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र आजचा बंद शांतेत पार पाडून विरोधकांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल गृहराज्यमंत्री केसरकर यांनी विरोधकांची स्तुती केली.
पेट्रोल डिझेल दरवाढीतुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असून, यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे.याबाबत लवकरच चांगला निर्णय होईल असे केसरकर यांनी सांगितले.